गेल्या काही वर्षांपासून कृष्णा-भिमा खोऱ्यातील भागात पूरचा त्रास जाणवत आहे. यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांना पूराचा त्रास होऊ नये यासाठी पुणे येथील कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयात संभाव्य पूर नियंत्रणाबाबत अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती.
संभाव्य पूराचा धोका टाळण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना, पावसाच्या अतिरिक्त पाण्याचे नियोजनाचा आढावा यावेळी घेण्यात आला. शेजारच्या राज्यांशी चर्चाही सुरू आहे तसेच पावसाळा सुरू होण्याआधीही एक बैठक घेतली जाईल. संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics